मुंबई । विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मतपत्रिकेने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देतांना, मतपत्रिकेशिवाय आणखी काही आधुनिक पर्याय असेल तर त्याचाही विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादांनी ईव्हीएम आणि मतपत्रिकेशिवाय सुचवलेल्या तिसऱ्याचं पर्यायाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. काय सूचना करावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरी सरकारला सांगितले असले तरी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ त्यावर चर्चा करेल आणि पुढे कसे जायचे ते ठरवतील असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिलं.
याशिवाय, मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय अंतिम असेल असे सांगतानाच मशीनने पेपरलेस काम होते म्हणून तो पर्याय आला. परंतु देशाच्या लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका मशीनद्वारे होतात. इतर निवडणुकाही मशीनद्वारे होतात. मात्र त्यात कुणाला शंका वाटत असेल, त्रुटी राहिलेली दिसत असेल, नवीन तंत्रज्ञान आलेले असेल आणि त्यातून पारदर्शकता निर्माण करता येत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.