पोलीस दलात खळबळ ! पोलीस उपायुक्त पथकातील कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – वाळूचा हायवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यापारा करून दर महिन्याला सात हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपायुक्त झोन 2 च्या पथकातील कर्मचारी विनायक गीते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे, लाच घेणारा गीते हा पुंडलिक नगर ठाण्यातील कर्मचारी असून त्याला एका वर्षापूर्वीच उपायुक्तांच्या पथकात संलग्नित करण्यात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

विषयी अधिक माहिती अशी की, पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील गीते (33) हा एका वर्षापासून पोलीस उपायुक्त झोन 2 च्या पथकात कार्यरत आहे. शेंदूरवादा येथील वाळूच्या व्यापाऱ्याला शहरात वाळू विक्री करायची असल्याने तो गीते याला भेटला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्याने दरमहा 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्याकडे तक्रार नोंदवली. नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी तक्रारीची शहानिशा केली असता तक्रारीत तथ्य आढळले.

यावरून पोलीस निरीक्षक अनिता इटुबुने, नंदकिशोर क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, बाळासाहेब राठोड, भूषण देसाई, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कांचनवाडीतील एका हॉस्पिटल समोर सापळा रचून गीते लाच घेताना अटक केली. पोलिस उपायुक्तांच्या पथकातील कर्मचारी लाच अडकल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment