सोलापूरचे उपमहापौर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलिसांनी काल सोलापुरातून अटक केली आहे. फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्याच्या मदतीने काळे यांना घरातून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंडवा येथील सिंधू सुभाष चव्हाण यांच्या मुलाने 15 लाख रुपये देऊन फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, मुलगा सचिन आणि पती सुभाष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्लटवर गेल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे समोर आले. बॉम्बे मर्कंटाईल एमजी रोड शाखेतील बँक मॅनेजरला हाताशी धरून नीता सुरेश लोटे राजेश दिलीप काळे यांनीच लिलावात तो फ्लॅट घेतल्याचे समोर आले. तर दुसरीकडे पिंपळे येथील एक फ्लॅट चौघांना विकून वेगवेगळ्या नावे त्या फ्लॅटवर राजेश काळे आणि निता लोटे यांनी चिंचवड स्टेशन परिसरातील देना बँकेतून कर्ज घेतले.

दरम्यान, बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर कुमुद बाबुराव वाळके यांनी निगडी पोलीस ठाण्यात राजेश काळे आणि निता लोटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्या दोघांवर त्या ठिकाणीही गुन्हे दाखल झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.