देशमुख, आव्हाड, सरनाईक, परब जेलमध्ये जाणार; किरीट सोमय्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीचे नेते ईडी च्या रडारावर आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत असतात. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी ठाकरे सरकार वर आरोप केला आहे. तसेच देशमुख, आव्हाड, सरनाईक आणि अनिल परब जेलमध्ये जाणार असा दावा केला आहे.

ठाकरे सरकारमध्ये 11 भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिलत असते. आता 11 ऐवजी 20 मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार आहेत असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असेही ते म्हणालेत. मला अनेक ठिकाणाहून फोन येत असतात. उद्या कोण टार्गेट आहे असं विचारलं जात असतं. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असं विचारण्यात येतं, असं त्यांनी सांगितलं.