सोलापूर | वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी, कार्तिकी विसरु नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन साजरी केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदयाने शासनाला सहकार्य केले.
परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा,एस.टी.बसेस,चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे येणार्या कार्तिकी वारीला पारंपारिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी ५० भाविकांना सर्व नियम लागू करुन परवानगी देण्यात यावी, दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यात परवानगी द्यावी,आळंदी येथील समाधी सोहळा,नगर प्रदक्षणा व पारंपारिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणार्या दिंडीला ५० भाविकांची परवानगी द्यावी.यांसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले.
यावेळी वारकर्यांना कार्तिकी यात्रेस परवानगी द्यावी. यावेळी वारकरी संप्रदाय शासनाचे सर्व नियमांचे पालन करतील.जर शासनाने कार्तिक वारीत अडथळा निर्माण केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’