डोंगरी विभागाला 17 कोटी 29 लाखांच्या विकास कामांना मंजूरी

0
68
Satara Meeting
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 17 कोटी 29 लाख रुपये निधी खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कायर्कारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तसेच सर्व सदस्यांना समन्यायी पध्दतीने निधी वाटपाचे सुत्र यावेळी ठरविण्यात आले. तसेच सर्व सदस्यांनी कामांची यादी दिली असून त्यानुसार लवकरात लवकर कामे सुरु करावी व शंभर टक्के निधी खर्च होईल याकडे यंत्रणांनी लक्ष द्यावे अशा सुचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.