सत्तारांच्या विधानाचे समर्थन नाहीच; फडणवीसांनी केली कानउघडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सत्तारांची कानउघाडणी करत त्यांच्या विधानांचे समर्थन नाहीच असं म्हंटल आहे.

फडणवीस म्हणाले, कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोधच करु. ते जसं आमच्याकडच्या नेत्यांना लागू आहे, तसं त्यांच्याकडील नेत्यांनाही लागू आहे. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. सत्तार जे काही बोलले ते चूकच आहे पण त्याच वेळी खोके वगैरे उलट सुलट बोलणंही चूकच आहे असं फडणवीसांनी म्हंटल.

नेमकं काय आहे प्रकरण –

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. . इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीगाळ त्यांनी केली. सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.