आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही ; फडणवीसांच्या विधानाने राजकीय खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आमंत्रित माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता फार काळ विरोधात आपण बसणार नाही असे विधान केले. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या काळात माणसे रस्त्यावर मरून पडत असताना फक्त भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर होते आणि सल्ला देणारे मात्र बाहेरही आले नाहीत, फक्त अमुक, तमुक पॅटर्न असे सांगत राहीले अशी टिका त्यांनी शिवसेना व ठाकरे यांच्यावर केली. आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही भाजपच मोठा पक्ष ठरल्याचे त्यांनी म्हटले.

आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment