आगामी सर्व निवडणूका भाजप स्वबळावर लढणार ; मनसे- भाजप युतीची शक्यता फडणवीसांनी फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप आणि मनसे हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे भाजप आणि मनसेची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

यापूर्वी भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेसोबत युती होऊ शकते असं सांगून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप-मनसे युतीचं मोठं आवाहन राहणार असल्याचं बोललं जात होतं. पण फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment