Devendra Fadanvis | जपानच्या निधीतून देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत उभारल्या पायाभूत सुविधा; पुन्हा विजयी होईल विश्वास केला व्यक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Devendra Fadanvis | राज्यातील विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक लोक आता उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमधून उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी पुन्हा एकदा मी पुन्हा विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले प्रयत्न हे अनेक लोकांना माहित आहे. राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. तसेच मुंबईमधील अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना देखील त्यांनी गती देण्याचे काम केलेले आहे. मुंबईमध्ये सध्या अनेक पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे. यामागे राजकीय ताकद आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत. या प्रकल्पामध्ये रस्ते, मेट्रो, पुनर्विकास उपक्रम यांसारख्या बऱ्याच कामांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प हे पूर्ण होत नव्हते. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. राजकीयवाद तसेच इतर अनेक गोष्टींमुळे हे प्रकल्प रखडले होते. या सगळ्यामुळे मुंबईमधील असणाऱ्या लोकांना पायाभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. यातच महाविकास आघाडीच्या शासनाने यांमधील अनेक प्रकल्पाची प्रगती केलेली आहे. 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री आणि आत्ताच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईतील लँडस्केपला देखील पुन्हा आकार देण्यास सुरुवात केलेली आहे.

नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सगळ्या प्रभावशाली प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. आणि हे प्रकल्प पूर्ण केलेले आहे. 2015 मध्ये सुरू झालेल्या वॉर रूममध्ये सुरुवातीला पोस्टल रोड म्हणून नवी मुंबई विमानतळ दुसरी तिसरी मुंबई मेट्रो लाईन आणि मुंबई ट्रांसफारभरली यांसह त्यांनी दहा पायाभूत सुविधा प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलेले आहे. आणि त्यांच्या काळात चांगली प्रगती देखील झालेली आहे.

त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी यांच्यासोबत मुंबईतील प्रकल्पासाठी निधी मिळवून देण्यासाठी देखील पुढाकार घेतलेला होता. त्यामुळेच मुंबईतील अनेक प्रकल्प हे वेळेवर पूर्ण झालेले आहेत. आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा झाला आहे. या विविध जागतिक विकास उपक्रमांसाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यप्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये वाहतूक औद्योगिक ऑर्डर पाणीपुरवठा प्रकल्प यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात जपान उद्योग आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रातच जपानी इंडस्ट्रियल पार्कचा प्रस्ताव ठेवला यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील वाहतूक शहरी विकास आणि आरोग्य सेवा या खूप चांगल्या प्रमाणात लोकांना मिळाल्या.