इंटरनेट मुळे पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं; फडणवीसांनी केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात शक्ती कायदा विधायक मंजूर केल. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचे स्वागत करत आपलं मत मांडले. इंटरनेट मुले पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं होत आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण कायदेही केले पण ते थांबत नाहीत, तर यासंदर्भात आपलयाला मोहीम चालवावी लागेल असे फडणवीस यांनी म्हंटल.

विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

२०१३ पूर्वी ज्या गोष्टी विनयभंगाच्या संज्ञेत यायच्या त्या आता रेपच्या संज्ञेत गेल्या आहेत त्यामुळे एकप्रकारे जरब बसवण्याचे प्रयत्न या कायद्यामुळे झाले. परंतु तरीही मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत त्यामुळे महिलांचा आदर आपल्याला वाढवावा लागेल जेंडर इक्वॅलिटी नवीन पिढीला शिकवण्याचा तयारी आपल्याला करावी लगेल असे फडणवीस म्हणाले.

शक्ती कायद्यावर विधानसभेत चर्चा

आम्ही सर्वजण या कायद्याचे स्वागतच करतो मात्र हा कायदा फक्त पेपर वर न राहता या कायद्याद्वारे दोषींवर योग्य कारवाई झाली पाहिजे. काही बदल यात करावे जेणेकरून महाराष्ट्र विधानसभेने देशातील सर्वात एफ्फेक्टिव्ह कायदा मंजूर केला असे आपल्याला म्हणता येईल असं म्हणत फडणवीसांनी शक्ती कायद्याला पाठिंबा दिला

Leave a Comment