Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar : … तर घरी बसावं लागेल; फडणवीसांनी भाजपच्याच आमदाराला झापलं

Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar : महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज अनोखी गोष्ट बघायला मिळाली. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच आमदाराला झाप झाप झापलं विषय होता दारू बंदीचा, पण तो पोचला थेट लाडक्या बहिणींपर्यंत…. लाडक्या बहिणांना मध्ये घेतलं आणि देवेंद्र फडणवीसांचा पारा चढला. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच आमदाराला ठणकावून सांगितलं. सभागृहात नेमकं काय घडलं तेच थोडक्यात समजून घेऊया.

फडणवीसांनी कोणाला झापलं ? Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar

ज्या आमदाराला देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात सर्वांसमोर झापलं त्या आमदाराचे नाव आहे अभिमन्यू पवार, ते औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. एवढच नव्हे तर ते खुद्द फडणविसांचे माजी स्वीय सहाय्यक होते. अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अवैध दारुचा मुद्दा मांडला. मागच्या सरकारमध्ये आणि आता अशा दोन लक्षवेधी मांडल्या. तुमच्या दालनात ३ बैठका झाल्या. पण अजूनही याबाबत कारवाई झालेली नाही. हा सामाजिक विषय असून, प्रत्येक आमदाराचा आहे. ग्रामीण भागातील आमदारांना रोज त्रास होत आहे. कुठेही गेलो तरी आम्हाला अवैध दारुबद्दल विचारतात. आपण लाडक्या बहिणी म्हणतो, पण लाडक्या बहिणीचं काही दु:ख असेल तर अवैध दारुवर आळा घालण्याचं दु:ख आहे असं अभिमन्यू पवार यांनी म्हंटल .

फडणवीस संतापले –

अभिमन्यू पवार यांनी दारूच्या विषयात लाडक्या बहिणींना मध्ये आणल्याने एक प्रकारे सरकारचीच कोंडी झाली, त्यामुळे फडणवीस हे आक्रमक झाले (Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar). मी परत सांगतोय की प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल. लाडकी बहीणचे पैसे सुरुच राहतील, ही योजना सुरुच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनेशी तुलना करता येत नाही. अध्यक्षांनी दिलेले निर्देश अंमलात आले नसतील तर आता लगेच अंमलबजावणी केली जाईल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.