ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यात आज भाजपच्या वतीने पाणी प्रश्नावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला आहे. हे ठाकरे सरकार टक्केवारी आणि वसुलीमध्ये खुश आहे. पण जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही यांना झोपू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मराठवाडा पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यपस्थित होते. यावेळी सभेत फडणवीस म्हणाले की, “मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडून अजूनही ठाकरे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. येथील पाणी प्रश्नाबाबत ठाकरे सरकार अजूनही गंभीर नाही. सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे सगळं चालले आहे.

आज आम्ही या ठिकाणी पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिले नाही. पण ईश्वराने पाणी दिले. पण या सरकारला मोर्च्याच्या माध्यमातून थेट इशारा देत आहोत कि, जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.