फडणवीस मंत्रिपदाचा राजीनामा देणार; भाजपमध्ये मोठी उलथापालथ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला आहे. परंतु या निकालात भाजपला महाराष्ट्रामध्ये फारसे यश आलेले दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, फोडाफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रातील जनतेने मूळ पक्षांना मतदान केले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. दरम्यान, लोकसभेतील या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आज म्हणजेच 5 जून 2024 रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “मला सरकारमधून मोकळं करावं. अशी मी विंनती करणार आहे. मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतो. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.

पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो…

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. यातील भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो. भाजपला महाराष्ट्रामध्ये जो काही पराभव सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. आणि मी पक्षाला विनंती करतो की मला विधानसभेसाठी पूर्ण वेळ उतरायचे आहे, त्यामुळे त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी”