अन् फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत म्हंटली हनुमान चालीसा (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वाचणावरुन सध्या राज्याचं वातावरण तापलं आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याकरता निघालेल्या खासदार नवणीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. रविवारी न्यायलयाने त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. राज्य सरकारने राणा यांच्यावर राजद्राहाचा गुन्हा दाखल केला. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलंय. तसेच भर पत्रकार परिषदेत त्यांनी हनुमान चालीसाही म्हंटली.

फडणवीस यांनी नवनीत राणा यांची बाजू घेत सरकार वर निशाणा साधला. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला करू म्हटलं होतं का?हनुमान चालिसा करण्यास इतका विरोधा हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर पाकिस्तानात म्हणायची? असा सवाल फडणवीस यांनी केला. एका स्त्री साठी हजारो लोक जमा करता, त्यांच्या घरी जाऊन पोलीस अटक करतात. आणि पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं युद्ध करतात. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

असं काय झालं की देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतच म्हणुन दाखवली हनुमान चालिसा?

एका महिला खासदाराला नामोरहम करण्यासाठी रिमांडमध्ये वेगळं सेक्शन, दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचा सेक्शन, हनुमान चालिसा म्हणणं राजद्रोह होत असेल तर मी आता हनुमान चालिसा म्हणतो. अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं, मात्र राज्यात गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहून या सरकारने संवादाला काही जागा ठेवली नाही असं म्हणत  कोणी जर हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेलाच बरा, अशी आमची मानसिकता झाली आहे त्यामुळे आम्ही  बैठकीवर बहिष्कार टाकला असे फडणवीसांनी स्पष्ट केलं

Leave a Comment