विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या ‘त्या’ अदृश्य हाताचे आभार : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शिरगणनेद्वारे बहुमताची चाचणी करण्यात आली. यावेळी राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणीत तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे त्याच्याशी अदृश्यपणे राहून मते देणाऱ्यांचेही आभार मानले. “या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो मी पुन्हा येईन, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विशेष अधिवेशनात शिंदे – भाजप सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिकून राज्यात सरकार स्थापन केले. बहुमताच्या चाचणीनंतर फडणवीस यांनी प्रथम एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, 2004 पासून सलग चार वेळा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्याहून महत्वाचे म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झाले. त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला. 40 दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झाले.

विधानसभेत सत्ताधारी अन विरोधक आमने सामने

सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत असे मानने योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण आमच्याविरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहीली तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवारांचेही आभार : देवेंद्र फडणवीस

यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, मला आनंद आहे की शरद पवार यांनी देखील संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी माझा उल्लेख गौरवपूर्ण केला त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला संघस्वयंसेवक म्हटलं, मी आहेच. मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

Leave a Comment