हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis PM : १९ डिसेंबरला म्हणजेच आजच देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होईल असं खळबळजनक भाकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल होता. तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होणार या चर्चाना उधाण आले. देशात सत्ताबदल होण्यास जे कारण कारणीभूत ठरेल त्या एपस्टीन फाईल्समधील नेत्यांचे फोटो आज सकाळीच समोर आले. अजूनही काही फोटो रात्रीपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाला हादरवणारं काही सत्य खरच समोर येणार का? आणि त्यामुळे दिल्लीतील सत्ता हलणार का? याकडे देशवासियांचे लक्ष्य लागलं असताना आज या राजकीय भूकंपाचे संकेत देणारी घटना घडली आहे. एका उद्योगपत्याने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला आहे. त्यामुळे चर्चाना आणखी उधाण आलं.
नेमकं काय घडलं? Devendra Fadnavis PM
एका कार्यक्रमात बोलताना उद्योजक सज्जन जिंदाल यांनी भाषणादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला. पंतप्रधान मला बोलले, आपल्याला ५०० मिलियन टन स्टील बनवायचे आहे. आपल्याला ३०० मिलियन टनवर थांबायचे नाही. आपण चीनपेक्षा कमी नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपल्याला जगासाठी स्टील बनवायचे आहे. आपल्या देशात उत्पादन वाढवायचे आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. कारण आज आपण पंतप्रधानांना ऐकायला आलोय…असं त्यांनी म्हटलं. आपला उल्लेख पंतप्रधान असा केल्याने देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आश्चर्यचकित झाले. मात्र यानंतर जिंदल यांना त्यांची चुयक लक्षात आली. सॉरी, मी बोलण्याच्या ओघात चुकून देवेंद्र फडणवीस याना पंतप्रधान बोललो, मात्र एक दिवस ते नक्कीच देशाचे पंतप्रधान होतील (Devendra Fadnavis PM) असेही बोलायला सज्जन जिंदाल विसरले नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले होते?
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मराठी पंतप्रधान विधानाबाबत काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस याना विचारलं असता त्यांनी पृथ्वीबाबांना खोचला टोला लगावला. आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती हे आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागला म्हणजे निश्चितच यात काहीतरी काळबेरं आहे. त्यामुळे, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, असा विचार करुन त्यांनी स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये, असा माझा त्यांना सल्ला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते.




