शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं; फडणवीसांनी बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. भाजपला वेगळे पाडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्याने भाजप कडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.

फडणवीस यांनी एक व्हिडीओतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. या व्हिडीओतूनच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like