Wednesday, October 5, 2022

Buy now

देवेंद्र फडणवीसांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, राज्यसभेसाठी करता येणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने ते गृहविलगीकरणात होत. त्यामुळे त्यांना मतदान करता एंसार का? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, आज त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठीचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी घरातूनच ऑनलाइनद्वारे भाजपच्या बैठकींना उपस्थिती लावली होती. तसेच फोनद्वारे आपल्या पक्षातील आमदारांशी संवाद साधला होता. मात्र, आता ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असल्यामुळे ते आता भाजपच्या बैठकींना उपस्थित राहू शकणार आहेत.

आजच सकाळी फडणवीसांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे ते आजपासून पुन्हा होणार सक्रिय होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरेही करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान काल त्यांनी पुन्हा आपली कोरोनाची टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला.