पुण्यात नव्याने उभारणार विमानतळ; देवेंद्र फडणवीसांनी केले नाव जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने यावर्षी राज्यात विविध प्रकल्प सुरू केलेले आहेत. नागरिकांच्या भविष्याचा विचार करता अगदी सोयीस्कर होईल, अशा प्रकल्पांची सध्या उभारणी होत आहे. अशातच पुणे शहरांमध्ये एक नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. पुण्यामध्ये देखील विविध प्रकल्प चालू आहेत. आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “पुण्यामध्ये नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. मी मुरलीधर अण्णा यांचे विशेष कौतुक करतो. त्यांनी चांगली संकल्पना मांडली. या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव द्याव ही संकल्पना होती. त्यामुळे आता पुढील टप्प्यात नामकरणाचा हा प्रस्ताव राज्य मंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. आणि त्यानंतर मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवू तसेच हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि गडकरी यांनी घ्यावी” असे देखील त्यांनी सांगितले आहे.

यावेळी अनेक दिग्गज नेते तिथे उभे होते अनेकांची भाषणे देखील झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील भाषण केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील दहा वर्षाच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात खूप प्रकल्प आणलेले आहेत. तसेच पुणे शहरातील सगळ्यात मोठे काम म्हणजे चांदणी चौकाच्या कामासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज चौकातील उड्डाणपूल यासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांसाठी देखील 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या पर्यायी रस्त्याचा अवलंब केल्यावर पुणे शहरातील वाहतूक देखील कमी होईल आणि पर्यायाने प्रदूषण कमी होईल.

त्याचप्रमाणे आत्ता रस्ता बांधकामाच्या कामाला खूप जास्त वेग आलेला आहे. 2014 त्याच्या आधी 12 किलोमीटर रस्ते दर दिवसाला तयार होत होत. परंतु मागील दहा वर्षात यात खूप प्रगती झालेली आहे. आणि दर दिवसाला 28 किलोमीटरची कामे होतात. तसेच हायवेचा नेटवर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 60% हायवेच्या नेटवर्क झालेले आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गडकरींनी लक्ष द्यावे. असे देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भाषण केले आहे. त्यांनी पुण्यामध्ये होणाऱ्या नवीन विमानतळाचा उल्लेख केला. तसेच या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव दिले जाणार आहे. हे देखील सांगितले आहे. तसेच हा प्रस्ताव ते केंद्र सरकारकडे देखील घेऊन जाणार आहे असे गडकरींनी सांगितलेले आहे.