पंढरपूर प्रतिनिधी | वारकरी परंपरेत मार्गशिर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व असते. या महिन्यात भगवान पांडुरंग हे गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णूमंदिरात वास्तव्यास जातात. या महिन्यात भाविक विठ्ठलाच्या दर्शऩासाठी मंदिरात न जाता ते विष्णूपदाच्या दर्शऩासाठी अवर्जून हजेरी लावतात.
चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरापासून दक्षिणेस दीड किलोमीटर अंतरावर भगवान विष्णूचे मंदिर आहे. मंदिराला विष्णूपद म्हणून ओळखले जाते. येथे रुक्मिणीच्या सोधासाठी साक्षात भगवान श्री कृष्ण आल्याची अख्यायिका सांगितली जाते. आजही येथील हेमाडपंथी मंदिरातील खडकावर श्रीकृष्णाच्या पाऊल खूणा दिसतात.
दरवर्षी येथील श्री कृष्ण मंदिरात दर्शऩासाठी भाविकांची गर्दी होते. भाविक मंदिर परिसरात भोजन आणि भजन ही करतात. विष्णूपदाच्या दर्शनासाठी चंद्रभागेतून होडीने आणि गोपाळपूर मार्गे वाहनाने या विष्णूपदाकडे जाता येते.
महिनाभर दर्शऩासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, मंदिर समितीने येथे भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी सांगितले.