विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र रविवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले हे सर्वात ज्येष्ठ आमदार असल्याचंही थोरात म्हणाले आहेत.

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद हवं असल्याची चर्चा होत होती. मात्र, अखेर या चर्चांवर पडदा पडला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील हे स्पष्ट झालं आहे.

Leave a Comment