सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा घसरत आहे. आज सकाळी महाबळेश्वरच्या लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअस वर पोहोचल्यामुळे गवतावर हिमकण (दवबिंदू) गोठलेले पाहायला मिळाले.
या आठवड्यात महाबळेश्वरमध्ये दुसऱ्यांदा हीमकण गोठलेले पाहायला मिळाले. सध्या पर्यटक या थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सातारा शहरातील तापमानाचा पारा देखील 10 अंशावर पोहचला आहे. तर महाबळेश्वर येथील शहरातील तापमान 12 अंश सेल्सिअस इतके आहे. तर लिंगमळा परिसराचे तापमान 9 अंश सेल्सिअस आहे.
महाबळेश्वरला लिंगमळा परिसरात हिमकण गोठले pic.twitter.com/qQmX6zdZLW
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 14, 2023
गेल्या आठ दिवासापासून थंडीचा कडाका वाढला. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही महाबळेश्वरला दाखल होत आहेत. आज आणि उद्या संक्रात सण, शनिवार, रविवार सुट्या यामुळे पर्यटक मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा परिसरात गर्दी करतात.