Tuesday, January 7, 2025

आता लहान मुलांना विमानात मिळणार ही खास सुविधा; DGCA ने घेतला महत्त्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमान प्रवास करण्याच्या अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु जेव्हा त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. त्यांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळते. त्यावेळी मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्याचा त्यांनी या आधी विचारही केला नव्हता. अगदी सामानाच्या बाबत असो, तिकिटाचे दर असो किंवा लहान मुलांसाठीच्या जागेचा प्रश्न असो. या सगळ्यासाठी अनेक अडचणी उभ्या राहतात. आणि त्यावर नक्की कसा मार्ग काढावा हे देखील समजत नाही. विमान कंपन्या या त्यांच्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास जावा. यासाठी नवनवीन प्रयत्न करत असतात. परंतु काही विमान कंपन्या अशा आहेत, ज्या नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची मनमानी करत असतात.

तिकिटाचा दर असो किंवा मुलांना बसण्यासाठीच्या जागा असो. या सगळ्याबद्दल ग्राहक नेहमीच तक्रार करत असतात. आता डीजीसीए यांनी मंगळवारी म्हणजेच 23 एप्रिल 2024 रोजी एक नवीन आदेश जारी केलेला आहे. या आदेशानुसार आता सगळ्या एअरलाइन्सने आता 12 वर्षापर्यंतच्या मुलांना जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.

डीजीसीएने दिलेले आदेशात असे म्हटलेले आहे की, एअरलाइन्सना हे सुनिश्चित करावे लागेल की, आता बारा वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांच्या पालकांसह एकाच पीएनआरवर प्रवास करतील. त्यांना किमान एक जागा मिळेल. याशिवाय जागा वाटपाचा रेकॉर्ड देखील आता ठेवावा लागणार आहे.

या बातमीनंतर आता विमानाने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांच्या समस्या सुटलेल्या आहेत. कारण जेव्हा लहान मुलांना घेऊन विमान प्रवास करावा लागतो. त्यावेळी जागे संबंधित किंवा इतर गोष्टीतही अनेक अडचणी येतात. परंतु आता या निर्णयामुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत.