धाकधूक कायम ः सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत 2 हजार 1 कोरोना पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 17 हजार 143 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 91 हजार 752 आहे. तर जिल्ह्यात एकूण 72 हजार 270 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2290 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. गेल्या तीन दिवसांत दीड हजारांपेक्षा जास्त बाधितांचा नवा उंच्चाकी आकडे जिल्ह्यात येत आहेत. काल दिवसभरात 1 हजार 670 रूग्ण बरे होवून घरी गेले ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. मात्र आज नव्याने आलेल्या 2 हजार 1 बांधितांच्यामुळे जिल्ह्यासाठी धाकधूक कायम आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment