औरंगाबाद : संपूर्ण राज्यात पेट्रोल डिझेलचे व खाद्य तेललाचे दर शंभरी पार गेले आहेत. त्या विरोधात अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक सामाजिक संघटना विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. आज औरंगाबाद शहरात देखील झाले पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्याने ‘धक्कामार’ आंदोलन करण्यात आले. हे आगळे वेगळे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी यांच्याकडून करण्यात आले आहे.
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर गाडयांना धक्का मारत या वाढत्या दराचा निषेध यावेळी करण्यात आला. त्यावर बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष अनिल धांडे म्हणाले की, ‘खाद्यतेल, घरगुती गैस तसेच खाद्य तेल यावर केंद्र सरकारने अधिक दर लावले असनून त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे’.
दरम्यान हे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनाच्या काही मुख्य मागण्या आहेत, यामध्ये जीवन आवश्यक खाद्य तेलाचे भाव कमी करा, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, वीजबिल माफ करा या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकत्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली