औरंगाबाद : कोरोनामुळे रस्त्याच्या कामाला संथ गती प्राप्त झाली असून गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. 2019 मध्ये झालेल्या सुनावणीत उड्डाणपुलाचे काम जुलै 2011 पर्यंत पुर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. या उड्डाणपुलाच्या 19 कोटी 68 लाखांचे कार्यादेश देण्यात आल्याचे दीड वर्षापूर्वी हायकोर्टात निवेदन करण्यात आले होते.
सोमवारी सुनावणी झाली असता, 15 फेब्रुवारी 2011 पासून पंधरा महिन्यांत हा उड्डाणपूल पूर्ण करण्यात येईल असे निवेदन शपथपत्राद्वारे केले. तर शिवाजीनगर भुयारी मार्गाला अजूनही सुरुवात झाली नाही. याचिकेवर दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होईल.
शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि दुरूस्तीसंदर्भात अॅड. रुपेश जैस्वाल यांनी 2012 साली दाखल केलेल्या जनहित याचिकेत सोमवारी मुख्य मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. तसेच याचिकेवर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. तसेच याचिकेची व्याप्तीही वाढली आहे. अॅड. जैस्वाल यांनी 2019 मध्ये रस्तयासंदर्भातील सात मुद्दे मांडले होते. त्या अनुषंगाने रेल्वे महापालिका, पोलिस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागांना प्रतिवादी करण्यात आले आहे. विभागांनी त्यांच्या कामाचा प्रगती अहवालही वेळोवेळी साद केलेला आहे. विभागांनी त्यांच्या कामाचा प्रगती अहवालही वेळोवेळी साद केलेला आहे. दरम्यान, गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम जुलै 2011 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे शपथपत्र रेल्वे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सादर केले होते. तर शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रस्तावाबाबत सध्या परिस्थितीत काय आहे, याची माहिती घेऊन पुढील सुनावणीवेळी ती सादर करण्यात येईल.