बी-बियाणे अतिरिक्त भावाने विकल्यास होणार जागच्या जागी कारवाई; धनंजय मुंडेने दिले आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बी बियाणे पेरायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे या पिकांना काही दिवसात खते देखील द्यायला लागत असतात. परंतु आता या खरीप हंगामाच्या वेळी राज्यामध्ये बी बियाण्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही कृषी दुकानदार हे त्यांच्या सोयीने बियाण्यांचे भाव वाढवत आहेत. याबाबत आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये बी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि अतिरिक्त खताची जी मागणी होती, ती देखील येत्या आठवड्यात देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे बी बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव वाढवणाऱ्या कृषी दुकानदारावर आता सरकारचे लक्ष असणार आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील खरीप पिके, बी बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता, त्याचप्रमाणे आतापर्यंत केलेली पेरणी बियाणांची झालेली विक्री या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. या बैठकीतून धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कृषी अहवाल समजून घेतलेला आहे.

अतिरिक्त भरारी पथके दाखल

जे दुकानदार बियाणे जास्त भावाने विकतात, त्या गोष्टी रोखण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन भरारी पथके नेमावीत आणि दररोज कमीत कमी 25 दुकानांना भेट देऊन तपासणी करावी. आणि यात जर कोणताही गैरप्रकार आढळला, तर त्यांच्यावर जागच्या जागी गुन्हा दाखल करून परवाना बंद करण्याची कारवाई करावी असे आहे देखील सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रारीचे स्वतः दखल घ्यावी आणि एक तासात चौकशी करून तक्रारीचे निरसन करावे असे धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

जागच्या जागी कारवाई होणार

त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कमीत कमी 10 डमी गिऱ्हाईके पाठवून दुकानांवरील दर त्याचप्रमाणे इतर बाबींची पडताळणी करावी. आणि कुठेही गैरप्रकार आढळला तर जागच्या जागी कारवाई करावी. असे त्यांनी सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर कोणाचाही दबावाखाली न येता काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी कृषी विभागासाठी या काळात नेमावेत आणि त्यांनी पूर्ण वेळ सहाय्य करावे आणि जबाबदारी सांभाळावी अशी सूचना धनंजय मुंडे यांनी केलेली आहे.