अप्पा, तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती, तुमचा शब्द पूर्ण करणार; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने राज्यातील नेत्यांकडून मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना भावुक झाले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावनांचा वाट मोकळी करून दिली.

धनंजय मुंडे म्हणाले,अप्पा… तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. स्व. अप्पांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन…” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 12 dec “गोपीनाथ गड ‘ तुमचा नेता आणि माझा पिता…सजला वंचितांचा ‘गोपीनाथ गड’ आपल्या गोतावळ्या साठी” असे कॅप्शन देऊन गोपीनाथ गडाचे फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहेत.

Leave a Comment