…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ; पंकजा मुंडेंचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच नाव देखील अशाच प्रकरणात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा अस पंकजा म्हणाल्या.

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय

सरकार टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे, हे दुर्देवी आहे. संजय राठोड प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. सध्याच्या सरकारने जो पायंडा पाडला आहे, तो एका स्त्रीसाठी घातक आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment