माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

dhananjay munde karuna munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला हिरोईनची ऑफर होती .पण मी नवऱ्यासोबतच राहिले .माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते असा खळबळजनक दावा करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केला आहे. आज माझगाव कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना करून मुंडे यांनी हे खळबळजनक आरोप केला आहे. आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पहिल्या पत्नी आहोत, याबाबतचे सर्व पुरावे कोर्टात सादर केले असून लवकरच याबद्दलची रेकॉर्डिंग सुद्धा सादर करणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हंटल आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, आज मी कोर्टात सर्व पुरावे सादर केले आहेत .यात एक रेकॉर्डिंग सादर केलेले नाही पण ते करणार आहे .वसईतनामा स्वीकृती यावर ज्या सह्या आहेत जो अंगठ्याचा निशाणा आहे तो धनंजय मुंडे यांचाच आहे .राज घनवट यांची देखील त्यावर सही आहे .माझ्या घराच्या कर्जावर धनंजय मुंडे गॅरेंटर आहेत .मी त्यांची पहिली बायको आहे हे मला सिद्ध करायचे आहे .धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे अकाउंट आहे .माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते मी मीडियाला देणार आहे मला रस्त्यावर आणि मीडियावर आणणारा धनंजय मुंडे आहे .मला हिरोईनची ऑफर होती पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला .माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 करोड देणार होते असा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर केलाय.

आज धनंजय मुंडे घरात आरामात बसले आहेत, पण माझी अवस्था बिकट झाली आहे.. माझ्याकडे पुरावे नसते तर मी समोर आले नसते. धनंजय मुंडे यांना हे प्रकरण दाबायचे होते. माझ्या नावावर काही नाही. मला आणि माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असे गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केले आहेत.

दरम्यान, करुणा मुंडेंनी मुंबई सत्र कोर्टात सादर केलेले सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा आहे .वसीयतनामा स्विकृतीपत्रात धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत .काही ठिकाणी अंगठा लावला आहे .करुणा मुंडे यांनी पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनवला आहे असा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आहे.