ससूनमधील डॉक्टरच नव्हे, तर अनेकांनी आपलं ईमान विकलंय; धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून झालेल्या अपघात प्रकरणात (Pune Car Accident) ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ही गैरकृत्य केल्याची बाब उघडकिस आली आहे. अशातच आता काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये त्यांनी, “कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाता वेळी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले” असे म्हणले आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

रविंद्र धंगेकर यांनी काय आरोप केले आहेत??

रविंद्र धंगेकर यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, “पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे,अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो,हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये.त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील.”

दरम्यान, कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पुणे पोलीसांनी अटक केली आहे. या दोन्ही डॉक्टरांना अग्रवाल कुटुंबांने पैशाचे उमेश दाखवले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच या डॉक्टरांना रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली होती. महत्वाचे म्हणजे, विशाल अग्रवाल यांनी अजय तावरेंना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे.