मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलंच रणकंद झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक आश्वासनही दिली गेलेली पाहायला मिळाली मात्र आता याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार धारावी सर्वेक्षण वेगाने सुरू असून आतापर्यंत येथील 25000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे
धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. त्याला गती देण्यासाठी आणखी पथक लवकरच तैनात केली जाणार असल्याची ही माहिती दिली आहे.
दिवसाला 50 पेक्षा अधिक पथक कार्यरत
धारावीतील पाच सेक्टर आणि 34 झोन मध्ये सर्वेक्षणासाठी प्रत्येक दिवशी 50 पेक्षा अधिक पथक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पथकांद्वारे सरासरी 300 ते 400 झोपड्यांची गणना करून साधारण 200 ते 250 घरांची पडताळणी दररोज केली जात आहे दोन निवडणुका पावसाळ्यासारखी आणि आव्हाने असूनही यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यापासून 25 हजार पेक्षा अधिक जोपर्यंत सर्वेक्षण पार पडलं आहे. 60 हजारांपेक्षा अधिक झोपड्यांची गणना करण्यात आली आहे. थोडक्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पांना गती घेतल्याचे दिसून येत आहे रहिवाशांच्या सर्वेक्षणाचा काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
‘या’ महत्वाच्या टप्प्यांचा समावेश
या कामातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे सर्वेक्षण. या कामाची सुरुवात जमीन शोधणाऱ्या पथकापासून सुरू होऊन त्यानंतर झोपड्यांच्या संख्येचे संकलन करण्यात येतं. यानंतर मग लाईडर मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करत संपूर्ण क्षेत्राचा लेआउट चित्रित करण्यात येतो. आधारभूत नकाशा प्रमाणे झाल्यानंतर घरोघरी पडताळणी सुरू होते. प्रत्येक घराला कोड देण्यात येतो अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान धारावी मध्ये 1 जानेवारी 2000 किंवा त्या आधी बांधलेल्या तळमजल्यावरील संरचना धारावी अधिसूचित क्षेत्रात त्याच जागी मोफत पुनर्वसनासाठी पात्र असतील. तर जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यान बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धारावी अधिसूचित क्षेत्राबाहेर 2.5 लाख रुपयांच्या किमतीत घर मिळेल. एवढेच नाही तर वरच्या मजल्यावरील इमारतींमधील रहिवासी जे एक जानेवारी 2011 किंवा 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान धारावीत राहायला गेले त्यांना धारावी अधिसूचित क्षेत्राच्या बाहेर भाड्याच्या खरेदीच्या पर्यायासह भाड्याने राहण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
नागरिकांना कोणत्या सुविधा मिळणार
धारावीच्या पुनर्वसनानंतर तिथं मोकळ्या जागा, रुंद रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि इतर सामाजिक सुविधा असलेल्या असून, रहिवाशांसाठी भाड्याची किंवा खरेदीची रक्कम सरकार निश्चित करेल. महत्त्वाची बाब म्हणजे रहिवाशांना पुनर्वसित इमारतींमध्ये 10 वर्षे देखभाल खर्च अर्थात मेंटनन्स नसेल. याशिवाय इथं 10 टक्के अतिरिक्त व्यावसायिक क्षेत्र मिळणार असून, ती भाडेतत्त्वावर देऊन त्या माध्यमातून सोसायटीला देखभाल मोफत करता येईल असा एकंदर आराखडा आहे.