हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मंत्री धर्मराव आत्राम (Dharmrao Baba Atram) यांच्या कन्येने म्हणजेच भाग्यश्री (Bhaghyashree Atram) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे तसेच थेट वडिलांविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही भाग्यश्री यांनी केली आहे. त्यामुळे धर्मराव आत्राम यांची चांगलीच आगपाखड झाली आहे. भाग्यश्री यांनी स्वतःच्या वडिलाला सोडून नवा वडील शोधला अशी टीका धर्मराव आत्राम यांनी केली आहे. माझ्याविरोधात उभ्या राहू द्या, पण त्यांनी जिंकूनही आलं पाहिजे असा खोचक टोलाही आत्राम यांनी लगावला.
प्रसारमाध्यांशी बोलताना धर्मराव आत्राम म्हणाले, मुलीने नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतले. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. नवदुर्गा माझ्या घरामध्ये बसले आहेत, एक माणूस देवी बनू शकत नाही, त्या दृष्टिकोनातून ठीक आहे जे बोलले ते पाहू पुढे. माझ्या विरोधामध्ये जिंकून आल्या पाहिजे हीच अपेक्षा आहे.त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांचे मागे काय आहे काय नाही हे मी सांगू शकत नाही, फक्त त्यांची भाषा सुधारली पाहिजे. आपण बोलत असताना मर्यादा ठेवून बोललं पाहिजे हे मी त्यांना शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे अशी प्रतिक्रिया धर्मराव आत्राम यांनी दिली.
यावेळी धर्मराव आत्राम याना जयंत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला. ‘एक बाबा गेले तरी शरद पवारांसारखे दुसरे बाबा पाठिशी आहेत’, या त्यांच्या विधानाबाबत विचारताच धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यावरूनही मुलीवर टीका केली. “ठीक आहे. त्यांनी स्वत:चे वडील सोडून नवीन वडील त्यांनी शोधले असतील. बघू काय करतात ते. घर फुटले तर बघू काय पुढे आहे ? कोणी घर फोडले. मी तर सांगत होतो साहेबांनी असा प्रकार करू नये, आता जे झालं ते घडलं आता घोडा मैदान समोर आहे असं म्हणत धर्मराव आत्राम यांनी मुलगी भाग्यश्रीला थेट आव्हान दिले.