धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन करणार भाजप प्रवेश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये धडक मारली. भारतानाचा पराभव देखील भारतीय जनतेने आणि क्रिकेट दिलाने स्वीकारत भारतीय क्रिकेट टीमला उत्तेजन मिळेल असे प्रोत्साहन दिले आहे. तर महेंद्रसिंग धोनी या विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेल असे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हणले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप पाठिंब्याची मोहीम राबवली होती. त्या मोहिमे अंतर्गत त्यांनी महेंद्रसिंग धोनी यांच्या घरी जाऊन देखील भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी देखील संजय पासवान यांनी धोनी राजकारणात आला तर तो भाजप मधूनच येईल. तो दुसऱ्या पक्षाचा विचार करणार नाही असे म्हणले होते. त्याच्या या दोन्ही वक्तव्यावरून भाजप धोनीला भाजपमध्ये सामावून घ्यायला किती उत्सुक आहे हे दिसते. भाजपने या आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याला देखील भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. भाजपमध्ये आपण आल्यास आपणास केंद्रीय क्रीडा मंत्रीपद देऊ अशी ऑफर देखील भाजपने गांगुलीला दिली होती. मात्र सौरभ गांगुली यांनी नम्रपणे भाजपच्या या प्रस्तावाला नकार दिला.

दरम्यान आता महेंद्रसिंग धोनी याला भाजपमध्ये आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तसेच त्याला भाजपमध्ये येण्यासाठी भाजप त्याला चांगलीच गरळ घालत आहे असे चित्र सध्या दिसते आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महेंद्रसिंग धोनी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment