Wednesday, October 5, 2022

Buy now

म्हैसाळमध्ये दहशत माजविणारी धुमाळ टोळी तडीपार, पोलीस अधीक्षकांनी दिला दणका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील सावकारी करून दहशत माजविणाऱ्या धुमाळ टोळीवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीविरुद्ध २०१० व २०२१ मध्ये बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करुन पैशावर भरमसाठ व्याज लावुन लोकांकडुन पैसे तसेच जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठा मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे गुन्हे दाखल आहेत.

धुमाळ टोळीतील सहा जणांना पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातुन सहा महिने तडीपार केले. शैलेश रामचंद्र धुमाळ, अशिष शैलेश धुमाळ, जावेद बंडु कागवाडे, अमोल आनंदा सुतार, सुरेश हरी शिंदे आणि बाबासो हेरवाडे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. म्हैसाळ येथे राहणाऱ्या शैलेश धुमाळ व त्याचा मुलगा आशीष हे दोघे दहा वर्षापासून म्हैसाळ परिसरात बेकायदा सावकरीत करतात. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर विशेष पथकाने त्याच्या विश्रामबाग व सांगलीतील घरावर छापा टाकून कोरे धनादेश, मुद्रांक व रोकड जप्त केली होती.

धुमाळ हा व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात घर, हॉटेल व इतर मालमत्ता हडप करीत होता. मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठा मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे शरिराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे सहा दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे व तक्रारी अर्ज दाखल झाले होते.