हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. अगदी कमी वयात देखील लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आजकाल डायबिटीसचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी कमी वयातील मुलांना देखील डायबिटीस झाल्याचे प्रकार समोर येत आहे. डायबिटीसवर अनेक औषधी देखील उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्ही घरच्या घरी काही उपाय केले, तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. आपल्या भारतीय पदार्थांना खूप जास्त महत्त्व आहे. त्यातील कढीपत्ता हा खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदात देखील कढीपत्त्याला खूप जास्त महत्त्व आहे. हृदयविकार तसेच संक्रमण आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. तसेच डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कढीपत्ता अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सीएम सारखे अँटिऑक्सिडंट आहेत. ज्यामुळे आपल्याला मधुमेह आणि हृदय विकाराच्या आजारापासून आराम मिळतो. आता मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता कसा उपयोगच आहे हे आपण जाणून घेणार आहे.
पोषकतत्वानी समृद्ध
कढीपत्त्यामध्ये अनेक जीवनसत्व तसेच अँटिऑक्सिडेंट आढळतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मधुमेहावर उपचार करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे.
फायबरने समृद्ध
कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया नीट होते. तसेच आपण खाल्लेले अन्न देखील चांगले पचते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. आणि मधुमेहापासून तुम्हाला आराम मिळतो.
इन्सुलिनची क्रिया वाढते
कढीपत्त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची क्रिया वाढते. आणि शरीर इन्सुलिन वापरण्यास सक्षम होते. आणि तुमच्या रक्तातील पातळी देखील स्थिर होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात येते.
तुम्ही जर रोज सकाळी सात ते आठ कडीपत्त्याची पाने चावून खाल्ली किंवा त्याचा रस करून पीला, तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. तसेच तुम्ही कोशिंबीरमध्ये देखील कढीपत्ता घालून खाऊ शकता. अनेकवेळा डॉक्टर देखील कढीपत्ता खाण्याचा सल्ला देतात.