Diabetes Patient Diet | मधुमेहाच्या लोकांनी ‘या’ भाज्या करा जेवणातून वर्ज, होईल मोठा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Diabetes Patient Diet | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. या बदललेल्या जीवन शैलीचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असतो. आज-काल मधुमेहासारखी समस्या बऱ्याच लोकांना होत आहे. अशा वेळेला विशेषता लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नसते. परंतु त्यांनी जर योग्य आहार निवडला तर ते या गोष्टींपासून नक्कीच सुटका करून घेऊ शकतात. मधुमेहासारख्या आजारावर जर तुम्हाला मात करायची असेल किंवा मधुमेह नियंत्रित ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदलाव्या लागतात. जर तुमच्या खाण्यामध्ये बदल झाला तर तुमचा धोका वाढतो. तर आज आपण अशा काही भाज्या आणि पदार्थ जाणून घेणार (Diabetes Patient Diet) आहोत ज्या खाल्ल्याने तुमच्या मधुमेहात भर पडते.

बटाटे

मधुमेह असलेल्या रुग्णांनी योग्य आहार निवडणे गरजेचा आहे. बटाट्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. बटाटा हा आजकाल सगळ्यांना आवडत असतो. परंतु बटाट्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी बटाटा हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी बटाट्याचे सेवन करणे टाळावे.

गोड मका

मक्यामध्ये कार्बोहायड्रसचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. आणि फायबर कमी असते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे. त्यांनी या मक्याचे सेवन करणे टाळावे.

हिरवा | Diabetes Patient Diet

हिरवा वाटाणा आजकाल सगळ्यांनाच आवडतो. परंतु या हिरव्या वाटाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर तुम्ही या हिरव्या वाटाण्यापासून लांब राहा.

रताळे

रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखर देखील वाढते. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी रताळी खाणे टाळावे.

कांद्याची पात

कांद्याची पात खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी कांद्याची पात खाणे योग्य आहे

गाजर आणि बीटरूट

ज्या लोकांना मधुमेह आहेत त्या लोकांनी सॅलड किंवा गाजर किंवा बीटरूट खाणे देखील टाळावे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर या भाज्या खाणे टाळावे.