पुणे | फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाऊंडेशन तर्फे मुक्तोत्सव २०१८ या मधुमेहींसाठीच्या महत्त्वपूर्ण वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २९ सप्टेंबर २०१८ रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास असणार आहे. जे मधुमेही अवघड अशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (जीटीटी) पास झाले आहेत, अशांचा मुक्तोत्सव या वार्षिक कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात लोकांना मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहार व व्यायाम याचे मार्गदर्शन डॉ प्रमोद त्रिपाठी यांसकडून केले जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे.
याबरोबरच कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांच्या तर्फे विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.मधुमेहींसाठी खास डायबेटीक फ्रेंडली सूप्स,सॅलडस,चटणी अॅन्ड डीप्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.क्लॅप जॅम आणि ड्रम सर्कल हा मनोरंजनाचा कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी असणार आहे.
मधुमेहींसाठी नवीन अॅप
फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ्री फ्रीडम फ्रॉम डायबेटीस हे मधुमेहींसाठी विकसित केलेले अॅपचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी सांगितले कि, फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन ही संपूर्ण परिवर्तनाचा अनुभव निर्माण करणारी संस्था असून ती मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधांपासून नैसर्गिकरीत्या मुक्त होण्यासाठी प्रशिक्षिण, प्रेरणा आणि सहायता देते. जे मधुमेही व त्यांचे परिवारातील सदस्य या संस्थेच्या संपर्कात येतात, त्यांच्या आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण व सकारात्मकतेत अमुलाग्र बदल घडतो. एकंदर अनुभव इतका सक्षम असतो की बरेच मधुमेही औषधे व इन्सुलिन पासून मुक्त व्हायला लागतात. विलक्षण व अत्यंत फायदेशीर परिणाम व सर्वांच्या सदिच्छेने आता हि एक सामाजिक चळवळ बनली आहे. डॉ.प्रमोद त्रिपाठी यांनी 2011 मध्ये फ्रिडम फ्रॉम डायबेटीस हा अभिनव कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाद्वारे साडे पाच हजारांहून अधिक लोकांची मधुमेहासाठीच्या औषधांपासून आणि एक हजार लोकांची इन्सुलिनपासून मुक्तता झाली आहे.
डॉ.प्रमोद त्रिपाठी पुढे म्हणाले की, ’मुक्तोत्सव’ चे मुख्य उद्देश्य फ्रीडम फ्रॉम डायबेटीस कार्यक्रमामार्फत ज्या मधुमेहींनी जीटीटी टेस्ट पास केली आहे त्यांचे यश साजरे करणे आहे व इतर मधुमेहींना यासाठी प्रेरित करणे आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण तरीही यावर मात करणे शक्य आहे आणि हेच आम्हांला या कार्यक्रमामार्फत दाखवायचे आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्याासाठी व मोफत नोंदणीसाठी संपर्क : 7776077760