हुकूमशहा किम जोंग-उन ने अमेरिका हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हंटले

नवी दिल्ली । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने म्हटले की, अमेरिका हाच त्यांच्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. योनहॅप न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार किम जोंग यांनी सांगितले आहे की, उत्तर कोरियाबाबत अमेरिकेचे धोरण कधीही बदलणार नाही. तसेच हे यावरही अवलंबून असेल की, व्हाईट हाऊसमधील सर्वोच्च स्थान कोणाकडे राहणार आहे.

उत्तर कोरियाच्या नेत्याने यावर जोर दिला की, अमेरिका उत्तर कोरिया विरोधी आपली धोरणे जेव्हा नाकारेल तेव्हाच या दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन ने म्हटले की, त्यांचा देश (उत्तर कोरिया) शत्रू सैन्य रोखण्यासाठी आण्विक शास्त्रांमध्ये सुधारणा करेल.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. एजन्सीने आपल्या अहवालात किमचा हवाला देत म्हटले आहे की, “कोरियन द्वीपकल्पातील वाढत्या लष्करी धमकीचे सक्रियपणे आणि पूर्णपणे निर्मूलन तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी, अणु तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणे, आकार आणि वजन कमी करणे आणि अण्वस्त्रांची सामरिक सामर्थ्य वाढविणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like