सिताराम येचुरी चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांना खरंच बाॅस म्हणाले होते का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी चिनी अध्यक्षांना आपला बॉस म्हणून संबोधलेला दावा केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट फिरतो आहे. हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये वास्तविक ट्वीटपासून अनेक विसंगती दिसून आल्याचे आढळून आले आहे. ट्विटमध्ये नमूद केलेली तारीख २० ऑक्टोबर, २०१५ ही येचुरी ट्विटरवर सामील होण्यापूर्वीची होती असेही सांगण्यात आले आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेच्या पूर्वेकडील लडाख भागातील गलवान खोऱ्यात १५ जून दरम्यान भारत आणि चीनी सैन्यामध्ये झालेल्या चकमकीमुळे २० भारतीय सैनिक ठार झाले त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. २० ऑक्टोबर २०१५ रोजी सीताराम येचुरी यांनी केलेले ट्विट, “कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, माकपच्या संबंधांना महत्त्व देत आहे. एकूणच, मी माझ्या बॉसची भेट घेतल्यामुळे मला आनंद झाला आहे. भारतासाठी त्यांनी दिलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी मी उत्सुक आहे.” असे होते.

 

जिनपिंग यांच्यासोबत येचुरी हातमिळवणी करत असतानाच्या फोटोसहित हा स्क्रिनशॉट आहे. येचुरी आणि जिनपिंग हे दोघेही कम्युनिस्ट विचारधारा पक्षांचे नेते आहेत. चीनविरूद्ध देशातील विविध भागात निषेध होत असल्याने तसेच चीनउत्पादित उत्पादने यांच्यावर बंदी टाकण्यासाठी अनेकांनी मोहीम सुरु असल्याने हा बनावट स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी शेअर केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की सीताराम येचुरी यांनी चीनला पाठिंबा दिल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली जावी.मात्र हा स्क्रिनशॉट बनावट असल्याचे आता समोर येते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment