भाजप संगठन मेळाव्याला गर्दीच नाही ; दानवेंनी भाषण घेतले आटोपते…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

  सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 

       भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता मात्र शहांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी सांगलीत झालेल्या मेळाव्याकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असतानादेखील पाठ फिरवली. खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आदी असूनदेखील जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार कार्यकर्तेदेखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत. मोकळ्या खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला.
       कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे पंतप्रधान संवाद संघटन कार्यक्रमानिमित्त भाजपच्या बूथ आणि शक्ती केंद्र सदस्यांचे तसेच कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांगली मध्ये येणार होते. मात्र देशात असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली. सांगलीतील संघटन संवाद या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवली.
       कार्यालयातील शेकडो खुर्च्या ह्या रिकाम्या पडल्या होत्या. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविल्यास पुढच्या ५० वर्षात भारतात कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येणे केवळ अशक्य असेल असा विश्र्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे-पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पुढे असलेल्या शेखर इनामदार आणि अरविंद तांबवेकर यांनी तर कार्यालयाच्या रिकाम्या खुर्च्यांच्या शेवटच्या रांगेतच बसने पसंत केले. कार्यक्रम संपेपर्यंत ते काही पुढे आलेच नाहीत. अशा परिस्थितीचा अंदाज आल्यावर मोदींचे लाईव्ह भाषण संपल्यानंतर दानवे यांनी ”देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगलीला येऊ शकले नाहीत. सांगलीला हा तिसरा धक्का आहे. असं म्हणत दहा मिनिटातच आपले भाषण आटोपते घेतले. भाजपने मोठा गाजावाजा करत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत मात्र ऐनवेळी अमित शहांचा दौरा रद्द झाल्याने कार्यक्रमावर विरजण पडलं.

Welcome-Amy-Main1.jpg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment