हृदयद्रावक ! शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उमरेड : वृत्तसंस्था – उमरेड या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शौचास बसलेल्या चिमुकल्याला उघड्या विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श हाेऊन त्याचा मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना गुुरुवारी दुपारी ४ वाजता उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील बाजार चौकामध्ये घडली आहे. या मृत चिमुकल्याचे नाव नैतिक पुजाराम बावणे असे आहे. मृत नैतिकचे वडील पुजाराम हे मासेमारीचा व्यवसाय करतात. गुरुवारी नैतिकची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला डॉ. टिकेश तेलरांधे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नैतिकचे वडील बाहेर गेल्याने आजी पुष्पा वाघधरे या आपल्या नातवासोबत होत्या. डॉ. तेलरांधे दवाखान्यात नसल्यामुळे पुष्पा काही वेळ तिकडेच थांबल्या. यादरम्यान नैतिकला शौचास आले. त्यानंतर आजीने त्याला उघड्यावर शौचास बसवले. नैतिक शौचास बसला असतानाच तेथे गाय आली. आजी पुष्पा यांनी गाईला हाकलण्यासाठी धाव घेतली. दुसरीकडे नैतिकही उठला. यादरम्यान नैतिकचा लगतच्या उघड्या डीपीच्या तारांचा स्पर्श झाला आणि नैतिक जागीच कोसळला. यावेळी पुष्पा यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यासुद्धा जखमी झाल्या आहेत. यानंतर नैतिकला तातडीने सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डाॅक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
सिर्सी येथील वर्दळीच्या ठिकाणी ही विद्युत डीपी आहे. अनेकवेळा या विद्युत डीपीचे झाकण उघडेच असते. आजही अशीच परिस्थिती होती. तसेच विद्युत वायरसुद्धा अस्ताव्यस्त होत्या. तसेच या ठिकाणी अनेकवेळा शॉर्टसर्कीटसुद्धा होत असे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल रोडे, प्रदीप चिंदमवार यांनी केली आहे.

Leave a Comment