दहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी; सर्वांना आश्चर्याचा धक्का

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मृत्यू पावलेल्या व्यक्ती परत जिवंत होऊ शकते का? असे कुणाला विचारल्यास वेगवेगळी उत्तरे येतील. पण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास फक्त ‘नाही’ हेच उत्तर मिळेल. पण स्पेनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. दहा दिवसापूर्वी कोविडमुळे मृत्यू पावलेली आज्जी परत तिच्या घरी स्वतः चालत आली आहे. त्यामुळे सर्वांनाच एक सुखद धक्का बसला.

रोजेलिया अलिया ब्लांको असे या अजीचे नाव आहे. 85 वर्षीय या आजीबाईंची डिसेंबर 29 मध्ये कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव आली. यानंतर आजींना कोविड-19 केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर अचानक 13 जानेवारी रोजी त्यांच्या पतीला आजीबाईचे निधन झाल्याचे कळवण्यात आले. त्यांना कोविड मुळे आज्जीचे फिनरल सुद्धा अटेंड करून दिले नाही. अचानक दहा दिवसांनी आजी परत घरी आली. यानंतर कोविड केअर सेंटरमधून चुकीची माहिती अजोबापर्यंत आल्याची बाब उघडकीस पडली.

आजी सुखरूप घरी आल्यानंतर त्यांचे पती रोमन ब्लँको यांनी खूप आनंद व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘मी पूर्णपणे कोसळून गेलो होतो. पण आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे’. करोणाने खूप लोकांना त्याच्या परिजनापासून हिरावून घेतले व अजूनही घेत आहे. त्यात आपला जवळील व्यक्ती सुखरूप आहे हे ऐकल्यानंतर खूपच दिलासा मिळतो हेही तितकेच खरे.

You might also like