इंधन दरवाढीचा धडाका सलग दहाव्या दिवशीही कायम; जाणून घ्या आजचे डिझल-पेट्रोलचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा धडाका लावला आहे. दैनंदिन इंधन दर आढावा पुन्हा सुरु केल्यानंतर देशातील डिझल-पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. देशात सलग १० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ६० पैशांनी तर डिझेल ६१ पैशांनी महागले आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल प्रती लीटर ८२.७० रुपये झाले आहे. रविवारी पेट्रोलचा भाव ८२.१० रुपये होता. डिझेलच्या दरात वाढ ६१ पैशांची वाढ झाली आणि डिझेल ७२.६४ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.७८ रुपये झाला असून त्यात कालच्या तुलनेत ६२ पैशांची वाढ झाली. डिझेलसाठी दिल्लीकरांना ७४.०३ रुपये मोजावे लागत आहे. त्यात ६४ पैसे वाढले आहेत.

कोलकात्यात पेट्रोल ७७.६४ रुपये असून डिझेल ६९.८० रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ५९ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ७९.५३ रुपये असून डिझेल ७२.१८ रुपये आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी रविवार ७ जूनपासून दररोज इंधन दर आढावा घेण्याची पद्धत सुरु केली. गेल्या १० दिवसांत पेट्रोल ४.३८ रुपयांनी महागले आहे. डिझेलच्या किमती ४.३९ रुपये प्रती लीटरने वाढल्या आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर २ आणि ५ रुपयांनी वाढवला आहे.

दरम्यान, आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये २ टक्के वाढ झाली. कच्च्या तेलाचा भाव (Crude Oil) सिंगापूरमध्ये प्रती बॅरल ३८.७३ डाॅलरवर गेला. त्यात १८ सेंट्सची वाढ झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये क्रूडचा भाव प्रती बॅरल ०.२ टक्क्याने कमी होऊन ३६.२६ डाॅलर झाला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment