औरंगाबाद | दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. काल शहरवासीयांना पेट्रोलसाठी 100 रुपये 17 पैसे मोजावे लागले. पॉवरपाठोपाठ सध्या पेट्रोलनेही रविवारी शंभरी गाठली, तर डिझेलच्या दरानेही शतकाकडे वाटचाल सुरू केली असून आता शंभरी गाठायला अवघे 8 रुपये 31 पैसे बाकी आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे आधीच हाल होत आहेत. त्यामध्ये वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर खाद्यपदार्थाचे वाढते दर, जीवनावश्यक वस्तू चे वाढते दर यामुळे नागरिक अडचणीत सापडलेल्या आहेत. शनिवारी पेट्रोल 99 रुपये 88 पैसे प्रति लिटर विकले गेले होते. रविवारी सकाळी जेव्हा वाहनधारक पेट्रोल पंपावर पोहोचले तेव्हा त्यांना काही पंपावर 100 रुपये 03 पैसे, तर काही पंपावर 100.17 पैसे असा हा आकडा लिटर वर दिसून आला. डिझेलचे भाव मागील पंधरा दिवसात प्रतिलिटर 2.74 रुपयांनी वाढून रविवारी ते 91.69 रुपये प्रति लिटर विक्री झाले.
वेगाने दरवाढ
2020 च्या सुरुवातीला साधारणता; 78 रुपये प्रति लिटर असणारे पेट्रोल 2021 च्या मध्यावर म्हणजे अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत 20 रुपयांपेक्षा अधिक रकमेने वाढले आहे.