हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या आरोग्यासाठी अंडी खाणे खूप फायदेशीर असते. अंडीच वीला देखील चांगले लागते. तसेच अंड्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. जर तुम्ही दररोज अंडी खात असाल, तर तुमच्या शरीराला कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही. परंतु बाजारामध्ये आजकाल अंड्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एक म्हणजे गावठी आणि दुसरी म्हणजे बॉयलर अंडी. या अंड्यांमध्ये गावठी अंडी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या अंड्यांचा रंग काहीसा तपकिरी असतो. तसेच ही अंडी आकाराने लहान देखील असतात. आता कोणती अंडी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत? दोन्ही अंड्यांमध्ये काय फरक आहे?हे आज आपण जाणून घेणार आहोत.
शरीरासाठी कोणते अंड चांगलं
तपकिरी रंगाची अंडी याला गावठी अंडी असे म्हणतात. गावठी कोंबड्यांपासून ही अंडी होतात. तसेच पांढऱ्या रंगाची अंडी ही बॉयलर कोंबड्यांपासून मिळवली जातात. त्यांना इंग्लिश अंडी असे देखील म्हणतात. अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. परंतु गावठी अंड्यांमध्ये प्रोटीन सोबतच कॅल्शियम रोज इतर कॅलरीज देखील असतात. परंतु पांढऱ्या अंड्यामध्ये या कॅलरीज आणि कॅल्शियम तुलनेने कमी असतात. आजारी व्यक्तीच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी अनेक वेळा डॉक्टर हे गावठी अंड्यांचे सेवन करण्यासाठी सांगतात. गावठी अंडी ही थोडी महाग असतात. पोल्ट्रीच्या अंड्यांमध्ये आवश्यक ती पोषक तत्वे देखील असतात.
किती अंडी खावी ?
अंड्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळते. तसेच शरीराची झीज देखील भरून काढली जाते. यासाठी राष्ट्रीय अन्न समन्वय समिती यांनी संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे अशी जाहिरात देखील केली होती. तुम्ही दररोज एक अंडे खाऊ शकता. परंतु तुम्ही जर अंड्यातला पिवळा बलक खाणार नसाल, तर तुम्ही चार अंडी देखील खाऊ शकता. अशाप्रकारे जर तुम्ही सेवन केले, तर तुमच्या शरीराला त्याचा खूप फायदा होईल.