भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाले वेगवेगळ्या सिरीजचे Google TV; पहा फीचर्स

Google TV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर चांगला स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर बाजारपेठेत वेगवेगळ्या ब्रँड चे स्मार्ट टीव्ही लॉन्च झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे गुगल टीव्ही. भारतीय बाजारपेठेत इंडकल टेक्नॉलॉजी ने असर ब्रँडच्या गुगल टीव्हीची नवीन सिरीज लॉन्च केली. यामध्ये नवीनतम लाइनअपमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या सिरीज मध्ये QLED आणि OLED या टीव्हीचा देखील समावेश आहे. कंपनीने या नव्या सिरीज मध्ये O, H, G, I, V, W या लाइनअपचा समावेश यात केला आहे.

Acer lounch google TVs

इंडकल टेक्नॉलॉजीने असर ब्रँडच्या गुगल टीव्ही मध्ये QLED आणि OLED या दोन टीव्ही चा समावेश केला आहे. यातील O सिरीज हे फ्लॅगशिप मॉडेल आहे. यामध्ये 55-इंच आणि 65-इंचाचे TV येतात. यामध्ये तुम्हाला OLED डिस्प्ले तंत्रज्ञान देण्यात आलं आहे . यासोबतच, 60W स्पीकर सिस्टमसाठी मोठ्या वूफर देखील असेल. V सिरीजच्या QLED पॅनेलसह भारतीय बाजारावर कब्जा करणं हे या ब्रँड चा उद्देश आहे. QLED तंत्रज्ञान हे सॅमसंगद्वारे विकल्या जाणार्‍या अल्ट्रा हाय एंड मॉडेल्सवर पाहिले जाते, पण हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी जास्त सोप्प करण्यासाठी तयार केले गेले आहे.

यातील V सिरीजच्या TV बद्दल सांगायचं झाल्यास, या टीव्ही 32 इंच पासून ते 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच पर्याय देखील उपलब्ध आहेत. या टीव्हीच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये MEMC, Dolby Atmos, Dolby Vision, 4K upscaling, ग्रेट ब्राइटनेस, यासोबत अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आणली आहेत.

या नव्या लॉन्चिंग मध्ये H सिरीज सुद्धा असून यामध्ये 76W स्पीकर सिस्टम आहे, जी जास्त इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव आणण्यासाठी लाभदायक बास आणि ट्रबल ऑफर करण्याचे काम करते.

नवीन गुगल टीव्ही, प्रीमियम QLED ही टीव्ही वेगवेगळ्या रेंज सोबत उपलब्ध आहे. ज्यामध्ये W सिरीजचा समावेश आहे. यामध्ये अँटी-ग्लेअर डिस्प्ले, फ्रेमलेस डिझाइन, इमर्सिव्ह साउंड आणि मोशन सेन्सर असतील.