हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डीजीलॉकरच्या माध्यमातून आपल्याला अनेक फायदे मिळतात. आणि आता यात आणखी एका वैशिष्ट्याचा समावेश होणार आहे . कारण आता उमंग अॅप आणि डिजिलॉकर यांचे एकत्रिकरण होणार आहे. आणि यामध्ये आपल्याला नवीन वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहे. याबद्दलची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता युजर्सचा डीजीलॉकर द्वारे वैयक्तिक आणि अधिकृत कागदपत्रे तसेच अनेक सरकारी सेवांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. परंतु सध्या तुम्ही फक्त अँड्रॉइड यूजर इंटिग्रेशन करू शकतात. म्हणजे केवळ अँड्रॉइड युजर डिजिलॉकर मधील उमंग अॅप इंटिग्रेशनचा फायदा घेऊ शकतात. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये IOS साठी देखील हे येईल असे सांगण्यात आलेले आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रीय गव्हर्नमेंट विभागाने दिलेली आहे. आता डीजी लॉकर आणि उमंग ऍपच्या एकत्रित करण्यामुळे युजर एका प्लॅटफॉर्मवर आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रमाणपत्र, पेन्शन, उपयुक्तता, आरोग्य आणि प्रवास यासारख्या सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. ही सेवा आतापर्यंत केव्हा अँड्रॉइड युजर ऑफर केली जात होती. जर तुम्हाला इंटिग्रेशन मिळत नसेल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता.
सगळ्यात आधी तुम्ही डीजीलॉकर ॲप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करून घ्या.
त्यानंतर अँड्रॉइड फोन मध्ये डीजी लॉकर हे ॲप उघडा
त्यानंतर डीजी लॉकरमधील उमंग आयकॉनवर टॅप करा.
यानंतर प्रॉम्प्ट केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर वरून उमंग ॲप इंस्टॉल करा.
डीजी लॉकर काय आहे?
डिजिटल लॉकर किंवा डीजी लॉकर हे एक प्रकारचे आभासी लॉकर आहे. यामध्ये तुम्ही तुमच कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने ठेवू शकता. तुमचे कोणतेही सरकारी प्रमाणपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र पासपोर्ट इत्यादी डिजिलॉकर मध्ये साठवू शकता. तुम्ही एखाद्या कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर जर तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट घरी विसरले असेल, तर डिजिलॉकर मधील तुमचे डॉक्युमेंट हे ग्राह्य मानले जातात.