परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
शेतकरी महिलांना डिजिटल शेतीद्वारे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्क्रांतीची दालने उघडली आहेत . कृषी सेवा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. त्यासोबत डिजिटल तंत्रज्ञानाची जोड शेतकरी महिलांनी दिल्यास त्या स्वतः, सुशिक्षित मुली, बेरोजगार व इतर अनेकांना या साखळीमध्ये जोडून आर्थिक क्रांती घडू शकते असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प , नाहेप यांच्या वतीने कार्यरत सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पामध्ये डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्मनिर्भरता या राज्यस्तरीय एक आठवड्याच्या वेबिनार च्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ.ढवन बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. आर. सी. अग्रवाल, राष्ट्रीय संचालक नाहेप, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी, दिल्ली, ज्ञानेश्वर बोडके, अध्यक्ष, अभिनव फार्मर्स क्लब, पुणे तसेच भारताच्या प्रथम महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त स्वाती शिंगाडे, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ धर्मराज गोखले, आयोजक डॉ. जयश्री झेंड, प्रमुख संशोधक नाहेप प्रकल्प डॉ गोपाळ शिंदे, आयोजन सचिव डॉ . वीणा भालेराव उपस्थित होत्या.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. ढवन
म्हणाले कि, अगदी साक्षर असलेल्या महिला देखील स्मार्टफोन चा उपयोग करून स्मार्ट शेती करत आहेत. या महामारी च्या काळात, उत्पादक हे ग्राहकाच्या शोधात, तर ग्राहक शुद्ध, सकस, सेंद्रिय शेती उत्पादनाच्या शोधात असताना ही संधी ओळखून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग हा या दोघांमधील दुवा म्हणून करता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी डॉ आर. सी. अग्रवाल यांनी महिला शेतकऱ्यांची शेती कार्यात अहम: भूमिका असल्याचे सांगत आज शेतीमध्ये आपण मोबाईल फोन या तंत्रज्ञानाचा उपयोग अनेकविध कार्यासाठी करत आहोत. आपली चौथ्या हरितक्रांती कडे वाटचाल चालू आहे. ज्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता केवळ मोठ्या प्रमाणावर अन्न उत्पादनापेक्षा ही सकस आहार, पोषक अन्न निर्मितीकडे आपण वळलो आहोत. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग फवारणीसाठी करण्यात येऊ लागला आहे. पिकावरील कीड किंवा संसर्ग, ड्रोन द्वारे शोधून केवळ तेवढ्याच वनस्पतींवर कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो, पिकावर होणारा औषधे चा मारा कमी होतो, पोषक अन्न मिळण्यास मदत होते असेही त्या म्हणाले. अभिनव फार्मर्स ग्रुप पुणे चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर जी बोडके यांनी महिलांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती उत्पादनांची विक्री अगदी सहज सोप्या पद्धतीने शेतकरी महिला करू शकतील अशी अनेक उदाहरणे दिली. महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करताना ते म्हणाले, महिलांना मार्केटिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येते. परंतु त्याकरता महिलांनी पद्धतशीर, आदर्श व्यावसायिका प्रमाणे गिऱ्हाईक हाताळण्यास शिकले पाहिजे. भविष्यात कोरोना सदृष्य काळात परराज्यातील लोक महाराष्ट्रात परत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील लोकांनी भरपूर मेहनत करून या संधीचा उपयोग घ्यावा व आपली आर्थिक बाजू बळकट करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सदरील कार्यक्रमाचे संचालनडॉ. वीणा भालेराव यांनी केले तर उपअयोजन सचिव डॉ. गोदावरी पवार यांनी सर्व अतिथींचे, शेतकरी महिलांचे आभार मानले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.